राहू (प्रतिनिधी )
दौंड तालुक्यातील राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या लिपिकावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ओमप्रकाश पेटकर,(वय 50 वर्षे),रा.केडगाव ता.दौंड जि.पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यातील फिर्यादी व आरोपी हे राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोबत काम करित असुन यातील फिर्यादी या ऑफिसमध्ये काम करत असताना तेथेच काम करणारा आरोपी लिपिक ओमप्रकाश पेटकर हा फिर्यादी त्यांचेजवळ येवुन “माझे तुझेकडे थोडं काम आहे तु बाजूच्या संगणक रूममध्ये ये.”त्यावेळी फिर्यादी या संगणक रूममध्ये गेल्या असता तेथे आरोपीने फिर्यादीस तु खुप छान दिसतेस’असे म्हणून फिर्यादी यांचे खांद्यावर हात ठेवुन कानाला तसेच गालाला हात लावून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी या बस स्टाँप जवळ असताना आरोपीने त्याची फोर व्हिलर गाडीमध्ये येवुन फिर्यादीस अश्लील हावभाव करून चल तुला मी घरी सोडतो माझं पण तिकडे काम आहे.”असे म्हणाले असता फिर्यादी यांनी आरोपीस नकार दिल्याने आरोपी तेथुन निघुन गेला.
याबाबत पीडित महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
